विरंगुळा हॉटेल जवळील एटीएम फोडण्याचा प्रयत्न


 


स्थैर्य, वाई, दि.१९: वाई तालुक्यातील आसले गावाच्या हद्दीत पुणे-बंगलोर महामार्गालगत विरंगुळा हॉटेलच्या नजीक असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटर दि.19रोजी रात्री अज्ञात दोन चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला.कटवणी लावून उचकटून टाकण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद एसबीआय बँकेचे कर्मचारी अनिल यादव यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तोरडमल तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Don`t copy text!