जिंती नाका येथे एकास धमकावत लाथाबुक्क्यांनी मारहाण; सहाजणांवर गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२३ | फलटण |
जिंती नाका, फलटण येथील कोकाटे गॅरेज येथे दि. २३ एप्रिल रोजी दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास सुमारे सहाजणांनी श्रीकांत हनुमंत लुंगसे (वय ३५, राहणार लव्हे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर) यांना धमकावत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून बारामतीमार्गे जंक्शन येथे घेऊन गेल्याची फिर्याद लुंगसे यांनी फलटण शहर पोलिसात दिली असून सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन मोहन काटे (रा. वाफळे रस्ता, बाबरी वस्ती, उपळाई बुद्रुक, तालुका माढा, जिल्हा सोलापूर), अनिल दत्तात्रय घाडगे (राहणार बेलवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) व इतर अनोळखी चारजण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, २३ एप्रिल रोजी दुपारी १२.०० वा. च्या सुमारास कोकाटे गॅरेज, जिंती नाका, फलटण येथे फिर्यादी यांचे पोकलेनचा भूम स्टिक दुरूस्तीस आणलेला असताना पोकलेनचा वरील सहाजणांनी सचिन काटे याची मोटारसायकल व मोबाईल घरी पोहोच कर, असे धमकावून जोपर्यंत ती पोहोच करीत नाही तोपर्यंत तुला सोडत नाही असे म्हणून सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचे ताब्यातील स्कॉर्पिओ वाहनाने बारामती मार्गे जंक्शन येथे जबरदस्तीने घेऊन गेल्याची फिर्याद लुंगसे यांनी दिली आहे.

या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!