
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२४ | फलटण |
आसू तालुका फलटण गावचे हद्दीत ४ मार्च रोजी सायंकाळी ६.२० वाजता आकाश विश्वनाथ वाडेकर (वय ३२, राहणार आसू, तालुका फलटण) यास घराच्या आडोशाला बेकायदा देशी दारू विकताना पोलिसांना पकडले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून ७०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या सीलबंद १० सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत.
अवैध दारू विक्री प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी आकाश वाडेकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो. हवा. साबळे करत आहेत.
