
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, कराड, दि.९: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज सातारा जिल्हा दौऱ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील व श्याम पांडे उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराज बाबांनी नानाभाऊंचे, खा श्रीनिवास पाटील व नानाभाऊंचे मित्र श्याम पांडे यांचे स्वागत केले. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस चे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजित गुजर, माजी शहर अध्यक्ष प्रदीप जाधव, युवानेते इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण उपस्थित होते



