
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 15 जुलै 2024 | गोखळी | फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी – खटकेवस्ती येथील प्रगतिशील बागायतदार अशोक दिलीप गावडे (वय : 56) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सामाजिक, धार्मिक कार्यात, एकमेकांच्या सुखदुःख यामध्ये सहभागी होत असत. अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते.
त्यांच्या पश्चात आई, एक विवाहित बहिण दोन विवाहित भाऊ, भावजय, एक विवाहित मुलगी, एक मुलगा आहे. फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे यांचे ते थोरले भाऊ तर गोखळी विकास सोसायटीच्या सदस्या सौ. उषाताई गावडे यांचे पती होत.
राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत पुणे, सातारा, सांगली सोलापूर अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक, कुस्ती, राजकीय क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते. गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
