स्थैर्य, मुंबई, दि.२: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लखनऊ
महानगरपालिकेच्या मनपाचे 200 कोटी बाँड प्रतीकात्मकरित्या लाँच केले.
थोड्या वेळात ते इंडस्ट्रीशी संबंधित काही लोकांनाही भेटणार आहेत. ते उत्तर
प्रदेशमधील प्रस्तावित फिल्म सिटी निर्मितीविषयी चर्चा करतील. योगी
यूपीच्या फिल्म सिटीमध्ये मुंबईचे लोक यावेत, सामील व्हावेत आणि चित्रपटाचे
काम येथे सुरू व्हावे यासाठी डायरेक्टर्स-प्रोड्यूसर्सचा सल्ला घेतली.
तत्पूर्वी,
मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झालेल्या योगी यांनी अभिनेता अक्षय
कुमारची ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. सुमारे एक तास या दोघांमध्ये संवाद
झाला. अक्षयने त्यांना एक प्रोजेक्टदेखील दाखवला. याशिवाय या दोघांमध्ये
फिल्म सिटीबाबतही चर्चा झाली आहे.
बुधवारी सीएम योगींचा राहणार हा कार्यक्रम
सीएम
योगी यांनी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये फिल्म सिटीच्या
निर्मितीसाठी जागाही दिली आहे. 2 डिसेंबर रोजी योगी देशातील काही बड्या
उद्योजकांना आणि बँकर्सना भेटणार आहेत. यावेळी ते राज्यातील गुंतवणूकी,
प्रस्तावित फिल्म सिटी आणि फायनान्स सिटीबाबत चर्चा करतील.
केंद्राला मुंबईचे महत्त्व कमी करायचे आहेः सुप्रिया सुळे
योगींच्या
मुंबई भेटीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की
मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या
म्हणाल्या की, जर मुख्यमंत्री योगी यांना यूपीमध्ये बॉलिवूडसारखी फिल्म
सिटी बनवायची असेल तर माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. सुप्रिया सुळे
पुढे म्हणाल्या की बॉलिवूड आणि मुंबईमध्ये जे प्रेम आणि विश्वासाचे नाते
आहे त्याला कुणीही ठेच पोहोचवू शकत नाही.