दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ महासंघाद्वारे 44 व्या बुध्दीबळ ऑलिम्पीयाड स्पर्धेचे दि.28 जुलै ते दि. 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे आयोजन केले आहे. बुध्दीबळ खेळाकडे खेळाडूंना आकर्षित करण्याकरिता जिल्हा क्रीडा परिषद व जिहा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने जिल्हास्तर बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 3 ऑगस्ट 2022 रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा कीडा संकुल येथे करण्यात आले आहे.
या क्रीडा स्पर्धा इ. 1 ली ते 5 वी व इ. 6 वी ते 10 वी या दोन गटामध्ये होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता खेळाडूंनी आपली माहिती http;//forms.gle/qYqtVqWePe5tFyKWA या लिंकवर दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी सायं. 5 वा. पर्यंत भरावी.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.