उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत माहे ऑगस्टमध्ये तालुक्यांच्या ठिकाणी दौरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा मार्फत खाजगी नवीन वाहन नोंदणी व तत्सम कामकाज तसेच पक्की अनुज्ञप्ती व तत्सम कामकाज करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक यांचा सातारा जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी माहे ऑगस्ट 2022 मध्ये खाली नमुद केलेल्या दिनांकास दौरा आयोजित केला आहे.

फलटण दि. 4,11,18 व 25 ऑगस्ट 2022. वाई 3 व 17 ऑगस्ट, वडूज 5 व 19 ऑगस्ट, दहिवडी 12 व 26 ऑगस्ट, खंडाळा 10 व 24 ऑगस्ट,  लोणंद 29  ऑगस्ट व कोरेगाव  8 ऑगस्ट 2022 रोजी.

तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी, सातारा यांच्या आदेशान्वये वरील दौऱ्याच्या कामकाजामध्ये बदल करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!