
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२६ | सातारा |
सातार्यातील महामार्गावर असलेल्या अजंठा चौकातील अॅक्सिस बँकेच्या समोरील पार्किंगमधील दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ७ लाख ८० हजारांची रोकड अज्ञाताने हातोहात गायब केली. ही घटना दि. १७ रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत देवेंद्र केशवराव गायकवाड (वय ३५, रा. जाधववाडी, ता. तासगाव, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
महामार्गावरील अजंठा चौकातील प्रिती एक्झिक्युटिव्ह हॉटेलजवळ अॅक्सिस बँक आहे. या बँकेसमोर गायकवाड यांनी दुचाकी पार्क केली होती. त्यात ठेवलेली ७ लाख ८० हजारांची रोकड अज्ञाताने चोरून नेली आहे.
