आरोग्य विभागाचा मोठा निर्णय; १४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला असून, राज्यभरात १४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०४ नोव्हेंबर : राज्यातील शासकीय रुग्णालये आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विशेष भरती प्रक्रियेतून ही निवड करण्यात आली आहे.

विशेषज्ञ आणि एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश

या नवीन नियुक्त्यांमध्ये एकूण १४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असून, यामध्ये ७६६ एमबीबीएस डॉक्टर आणि ६७४ तज्ज्ञ शल्यचिकित्सक व डॉक्टरांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना किरकोळ आजारांपासून ते गंभीर स्वरूपाच्या उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

आरोग्य यंत्रणेला मिळणार गती

राज्यातील अनेक ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे उपचारांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. या १४४० नवीन अधिकाऱ्यांच्या रुजू होण्यामुळे आरोग्य यंत्रणेचा ताण कमी होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!