अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार


दैनिक स्थैर्य | दि. २५ जून २०२४ | फलटण |
सर्व अनुसूचित जाती सर्व सफाई कामगारांना लाड पागे शिफारशीनुसार, नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या हिताचा निर्णय सोमवार, दि २४ जून २०२४ रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. याबद्दल फलटण नगर परिषदेतील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस सातारा जिल्हा व फलटण तालुक्याच्या वतीने काल संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सोमवारी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे श्री. चरणसिंह टाक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्री. जयसिंग कछवा, राष्ट्रीय महामंत्री, श्री. दिलीप अण्णा चांगरे, प्रदेशाध्यक्ष, श्री. अनुप खरारे, कार्याध्यक्ष, श्री. अशोक मारुडा, प्रदेश उपाध्यक्ष, श्री. पी. बी. भातुकले, सचिव, श्री. बाली मंडपू, श्री. छगन महतो यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष, शहर व तालुका पदाधिकारी या सर्वांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!