जिल्हा परिषदेच्या ‘कमवा व शिका’ योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, पुणे, दि.१८: पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कमवा व शिका’ या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, बांधकाम विभागाचे सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती रवींद्र वायकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, समाज कल्याण विभागाचे सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार तसेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

गुणवंत आणि होतकरु विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षांसाठी प्रशासकीय कामाचा अनुभव आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मासिक मानधन देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!