
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २५ मार्च २०२४ | फलटण |
फलटण येथील कट्टर हिंदुत्ववादी गोरक्षक शरद भाऊ गाडे यांची विश्व हिंदू परिषद, बजरंग दल (फलटण तालुका) संघटनेच्या गोरक्षक व संवर्धन संयोजक (प्रमुख) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शरद गाडे हे फलटण येथील धडाडीचे गोरक्षक आहेत. गाडे यांनी फलटणसह इतर तालुक्यातही जाऊन असंख्य गोमातांचे प्राण वाचविले आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
