आकाश बागाव यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन


 

स्थैर्य, फलटण दि.१९: फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील 17 वर्षीय युवक आकाश बागाव यांचा 4-5 दिवसांपूर्वी अपघात होवून अपघातात त्याने पाय गमावला आहे. आकाश बागाव याच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असून कुटूंबातील उमद्या सदस्यावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे बागाव कुटूंब कमालीचे अडचणीत आले आहे. आकाश याच्यावर पुणे येथील इस्पितळात उपचार सुरु असून उपचारासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन बागाव कुटूंबियांकडून करण्यात आले आहे. 

बागाव कुटूंबावर ओढवलेल्या संकटात त्यांना मदत करण्यासाठी गोखळी येथील जय हनुमान दहीहंडी संघाने तात्काळ पुढाकार घेवून पंधरा हजार रुपयांचा आर्थिक मदत तातडीने केली आहे. आकाशच्या उपचारासाठी बागाव कुटूंबाला आणखीन मदतीची गरज असून सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी संदीप हरहर (मोबाईल क्रमांक 9445030702), राधेश्याम जाधव (मोबाईल क्रमांक 9881547366), गणेश गावडे ( मोबाईल क्रमांक 9975349970) या क्रमांकावर गुगल पे / फोन पे द्वारे मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!