दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्टीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । सातारा । भारत सरकार सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय विकलांग व्यक्ती विभागाकडून दिव्यांग व्यक्तींकरिता महत्वाच्या सहा शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केल्या आहेत. या केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी  इ. 9 वी ते महाविद्यालयीन विभागात शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी  ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून संबंधित संस्थांनी दि. 15 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पडताळणी करणे आवश्यक आहे असे, जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी  डॉ. सपना घोळवे यांनी कळविले आहे.

विद्यार्थ्यांनी राष्टीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarship.gvo.in) यावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज सादर करण्यासाठी प्रपत्र सदर विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर देण्यात आला आहे.  तरी दिव्यांग विद्यार्थ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन डॉ. घोळवे यांनी केले आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी  प्री. मॅट्रीक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या तीनही शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल माध्यमातुन कार्यान्वित केल्या जात आहेत आणि शिष्यवृत्तीची  रक्कम थेट लाभार्थ्यांना DBT मार्फत PFMS प्रणालीद्वारे पाठविले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!