भाजपा अल्पसंख्याक सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी अनुप शहा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०१ फेब्रुवारी २०२२ । फलटण । भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष पदी फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांची निवड करण्यात आलेली आहे. अनुप शहा यांच्या कामाचा धडाका पाहून भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनुप शहा यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार सदरील निवड करण्यात आली असल्याचेही शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

अनुप शहा यांच्या झालेल्या निवडीबद्दल माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते यांच्यासह सातारा जिल्हा फलटण तालुक्यातील विविध सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनुप शहा यांचे अभिनंदन केले.

Back to top button
Don`t copy text!