मूक-बधिर विद्यालय गोळेगाव येथे उद्या वार्षिक स्नेहसंमेलन; गौरी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण |महात्मा शिक्षण संस्था संचलित मूक-बधिर विद्यालय, गोळेगाव, ठाकुरकी, ता. फलटण येथे उद्या दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता वार्षिक स्नेहसंमेलन व विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौरी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत सौ. प्रियालक्ष्मीराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

यावेळी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजीराव बरडे, सौ. सायली तानाजीराव बरडे, गॅलेक्सी को-ऑप. सोसायटीच्या संचालिका सौ. सुजाता यादव, महिला सक्षमीकरणच्या डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन सौ. नीलम लोंढे-पाटील, माजी नगरसेविका सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. दीपाली निंबाळकर, सौ. प्रगती कापसे, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, श्रीमती रंजनाताई कुंभार, सौ.डॉ. पूनम पिसाळ, सौ. सविता दोशी, प्राचार्या सौ. प्रियांका पवार, सौ. संगीता दोशी, सौ. नीना कोठारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद हाके, मुख्याध्यापिका सौ. दिप्ती देसाई, सचिव सौ. वैशाली चोरमले, कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!