अंकुश भागवत यांची फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. 4 ऑक्टोबर : तरडगाव येथील कार्यकर्ते अंकुश रामचंद्र भागवत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलटण तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

भागवत हे तरडगाव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून परिचित असून, त्यांनी यापूर्वी तरडगाव ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या माध्यमातून काम केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रामभाऊ ढेकळे, तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा शिंदे, धीरेंद्रराजे खर्डेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अंकुश भागवत यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!