फलटणच्या अनिश गोसवीचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । फलटण । येथील जुन्या पिढीतील वृत्तपत्र विक्रेते स्व. भ. मा. गोसावी यांचा पणतू आणि स्व. अविनाश भगवान गोसावी यांचा नातू आणि मंगेश गोसावी यांचा सुपुत्र चि. अनिश मंगेश गोसावी, फलटण हल्ली पुणे याने ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असल्याचे यापूर्वीच जाहीर झाले आहे.

आज शुक्रवार दि. ३० सप्टेंबर रोजी बालकलाकार अनिश गोसावी याचा भारताच्या माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते उत्कृष्ट बाल कलाकार २०२० साठी ६८ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात येत आहे.

समारंभाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. डीडी नॅशनल टीव्ही चॅनलवरही हा सोहळा प्रसारित केला जाईल. समारंभ आज शुक्रवार दि. ३०/९/२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता सुरु होईल.

पुढील लिंक वर पहा हा सोहोळा – https://youtu.be/vwuejZVVuqI


Back to top button
Don`t copy text!