गुणवरे येथील वृद्धेचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण उपजिल्हा रुग्णालयात दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान आई अंजना भागुजी आढाव (वय ७० वर्ष, राहणार गुणवरे, तालुका फलटण) हिचा मृत्यू झाल्याची तक्रार मुलगा हनुमंत भागुजी आढाव यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, अंजना आढाव यांना शुगरचा त्रास जास्त होऊ लागल्याने उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे उपचारार्थ दाखल केले होते. उपचारादरम्यान शुगरचा त्रास वाढल्याने त्यांच्या किडनीवर सूज येऊन मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अधिक तपास पो. हवा. कर्णे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!