सांगवी येथे वृध्द दाम्पत्याचा गुदमरून मृत्यू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
सांगवी (ता. फलटण) येथील दशरथ दुर्गा सावंत वय (७५) व सौ. रतन दशरथ सावंत (वय ६८, दोघे रा. सांगवी, ता. फलटण जि. सातारा) या वृध्द दाम्पत्याचा १६ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत मुलगा विक्रम दशरथ सावंत याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक अरुण देवकर एलसीबी डॉग स्क्वाड भेट देऊन फिंगर प्रिंट फॉरेन्सिक टीमने पुरावे तपासले. या दाम्पत्याचा मृत्यू धुराने गुदमरून झाला असल्याबाबत डॉक्टरांनी सांगितले असून व्हिसेरा राखून ठेवला आहे. तो तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब, पुणे येथे पाठविला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!