फलटण: अमोल भोसले वाढदिवस सोहळा – सामाजिक कार्याचा गौरव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण येथे अमोल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम पार पडला. मान्यवरांनी त्यांच्या धम्मप्रसार व सामाजिक कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या.

स्थैर्य, फलटण, दि. १० एप्रिल : फलटण तालुक्यात भारतीय बौद्ध महासभा शाखेचे माजी संस्कार सचिव अमोल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या धम्मप्रसार आणि सामाजिक कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात सोमीनाथ घोरपडे यांनी अमोल भोसले यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सात्विक स्वभावाचा उल्लेख केला. त्यांच्या कुटुंबाचे धम्मप्रसारासाठीचे समर्पण उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या कार्यातून समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट परंपरांविरोधात जनजागृती होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

महावीर भालेराव यांनी अमोल भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. वंदना सूत्रपठणातून उपस्थितांमध्ये मंगल मैत्रीची भावना निर्माण करण्यात आली.

बीबीएम फॅमिलीच्या वतीने अमोल भोसले यांना भारतीय संविधानाची प्रास्ताविका आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी बाबासाहेब जगताप, विठ्ठल निकाळजे, रामचंद्र मोरे, आनंद जगताप, विजय जगताप यांच्यासह अनेक बौद्ध उपासक-उपासिका आणि कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या प्रेरणेने अमोल भोसले यांचे आयुष्य सुख, समृद्धी आणि सेवाभावाने परिपूर्ण होवो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!