स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्ला मलिक

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि. 22 : बाबा सगळीकडे महामारी पसरलीय माणसं पटापटा मरतायत. द्वारकामाईत जमलेले गावकरी घायकुतीला येऊन साईबाबांना सांगत होते.अल्ला मलिक…आभाळाकडे दोन्ही हात उंचावत बाबा म्हणाले जवळचं जात घेतलं. त्यात पोत्यातील गहू भरडुन काढले आलेलं पीठ शिर्डीत पसरलेल्या महामारीला रोखण्यासाठी शिर्डीच्या पंचक्रोशी बाहेर पसरवून टाकण्यास सांगितले.

कुणीही गावा बाहेर काय घरा बाहेर पडू नका असा फतवा काढला. बाहेरील पाहुण्यांना गाव बंदी केली…त्यावेळचा लॉकडाऊन म्हणा ना…लोकांनी बाबांच्या सुचनेच तंतोतंत पालन केलं…काही दिवसातच शिर्डीची महामारी आटोक्यात आली…संपली…शिर्डीवरील संकट टळलं… कुणी माना अथवा मानू नका  आम्हा त्याचे काय…आणि भगवंताची सारी लेकरे…एक पिता एक माय…मुलुंड मधील दिवंगत साई भक्त गव्हाणकारांचा मला फोन आला…संदीप तुमचे लगे राहो राजा भाई हे नाटक शिर्डीला करायचे आहे…भरत दाभोळकर यांचे स्क्रिप्ट…संतोष पवार समीर चौगुले किशोरी आंबीये आनंदा कारेकर प्रणव रावराणे जयवंत भालेकर अशी तगडी कास्टिंग असलेले लोकनाट्य लगे रहो राजभाई…याची निर्मिती माझी बहिण सौ ललित संतोष पोवळे हिची होती…नाटक ठरले…शिर्डीस ज्याचे लागतील पाय…टळतील अपाय सर्व त्याचे…या शिर्डीत आणि प्रत्यक्ष साईबाबांच्या दरबारात आम्हाला प्रयोग करण्याची संधी मिळाली…म्हणून आम्ही सगळे खूष झालो…त्या प्रयोगाच्या दरम्यान शिर्डीतील साईप्रसाद जोरी या युवकाने समनव्ययकाची  भूमिका निभावली…आमची उठबस साईबाबांचे दर्शन ते प्रयोगाला लागणारी व्यवस्था…सगळी कामगिरी त्याने चोख निभावली…या घटनेला दहा बारा वर्षे झाली…पण साईप्रसाद बरोबरची मैत्री आजही कायम आहे…कोण कुठला साईप्रसाद ना माझ्या नात्याचा ना गोत्याचा ना गावचा…मी मुंबईत तो शिर्डीत…माझ्याकडून त्याला काहीही फायदा नाही…उलट मीच  त्याला कधी शिर्डीला गेलो की दर्शनासाठी घेऊन जाण्यास भाग पाडतो…आम्ही वारंवार भेटतही नाही बोलत ही नाही…त्यानंतर तीन चार वेळा शिर्डीत प्रयोग करण्याची वेळ आली तेव्हां त्याला आवर्जून भेटलो इतकंच…तरीही साईसंस्थानमध्ये कार्यरत असलेला साईप्रसाद मला कित्येक वर्षे ऊन असो पाऊस असो की आत्ताचा लॉकडाऊन…दर गुरुवारी साईबाबांच्या गुरुवारच्या आरतीचे फोटो पाठवतो… धन्य तो साईप्रसाद आणि धन्य त्याची मैत्री…आजही सकाळीच त्याने पाठवलेले फोटो आले…अशा साईप्रसादांमुळेच लॉकडाऊन सुसह्य होतो…जगण्याची नवी उर्मी मिळते.

साईंचा झाला प्रसाद आम्ही गातो त्याचे पडसाद बाबांचा झाला प्रसाद आम्ही गातो त्याचे पडसाद सप्तसुरातुनी सप्तऋषीचे घ्या हो आशीर्वाद आम्ही गातो त्याचे पडसाद.

संदीप शशिकांत विचारे


Tags: मनोरंजनसातारा
ADVERTISEMENT
Previous Post

आज पासून कराड बाजारपेठ सुरु

Next Post

उपस्थिती शंभर टक्के, तरी काळजीसुद्धा शंभर टक्के घ्यावी – संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी

Next Post

उपस्थिती शंभर टक्के, तरी काळजीसुद्धा शंभर टक्के घ्यावी - संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

पसरणी घाटात दोन कारची धडक, पर्यटनाला आलेले पती-पत्नी व लहान मुलगी जखमी

March 8, 2021

कोरेगावनजिक अपघातात बिजवडीचा मोटारसायकलस्वार ठार

March 8, 2021

लोणंदच्या भारत गिअर्सचे कामगार आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आमरण उपोषण

March 8, 2021

कार्यक्रमांना गर्दी; प्रत्येकी दहा हजारांचा दंड वसूल पालिका व पोलीस प्रशासनाची कारवाई

March 8, 2021

रात्री उशिरा सुरू असणार्‍या दोन हॉटेलचालकांवर गुन्हा 

March 8, 2021

राज्यात भाजपचे सरकार येईल येईल ना. रामदास आठवले : नाराज काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल

March 8, 2021

तालुक्यातील मातंग समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहणार; कार्यकर्त्यांचा निर्धार

March 8, 2021

IPL वेळापत्रक जाहीर : 9 एप्रिलपासून होणार आपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात

March 7, 2021

‘ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला, त्यांचे स्वप्न भंग केले’ – पंतप्रधान मोदी

March 7, 2021

परिवर्तन बंगालमध्ये नाही, दिल्लीत होणार; भाजपकडून पैसे घ्या आणि तृणमूलला मतदान करा – ममता बॅनर्जी

March 7, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.