ऑल इंडिया लीनेस क्लब ऑफ बारामती विजेता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १० नोव्हेंबर २०२२ । बारामती । ऑल इंडिया लीनेस क्लब ऑफ बारामती ने सोलापूर येथे आयोजित स्पर्धे मध्ये विविध विभागात बक्षिसे जिकून अव्व्ल ठरण्याची उल्लेल्खनीय कामगिरी केली आहे.

या प्रसंगी लीनेस क्लब च्या शुभांगी चौधर, धनश्री गांधी, मृदुला मोता, कीर्ती पहाडे, नेहा सराफ, वैशाली वागजकर, पल्ल्वी सराफ, संगीता मेहता, साधना जाचक, निधी मोता,गीतांजली जाचक, राधिका जाचक आदी नि सहभाग घेतला.
डिस्ट्रिक्ट लीनेस मीट -सोलापूर ‘सुर्यप्रभा’ या कार्यक्रमाचे आयोजन ५ व ६ नोव्हेंबरला सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विविध जिल्हामधून लीनेस क्लब यांनी सहभाग घेतला होता.

या प्रसंगी प्रत्येक लीनेस क्लब सविस्तर माहिती, सामाजिक कार्य, महिलासाठी कार्य , कोविड मधील कार्याचा आढावा घेण्यात आला.
उल्लेखनीय कार्य करणारा क्लब म्हणून बारामती लीनेस क्लब चे अभिनंदन करण्यात आले व
आयोजित स्पर्धेत बारामती लीनेस क्लबने विविध बक्षिसे पटकवली
१-बेस्ट क्लब अवॉर्ड
२-फॅशन शो
३-बॅनर प्रेसेंटशन
४-बेस्ट सेक्रेटरी
५-बेस्ट सोलो डान्स परफॉर्मन्स
६-बेस्ट रांगोळी
७-फोटो काँटेस्ट
८-स्क्रॅप बुक
यांच्या सहित एकूण 13 बक्षिसे जिकून शिवाय लकी ड्रॉ मध्ये सुध्दा बारामती ने यश मिळवले.
बारामती च्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणजे सोलापूर येथील यश असल्याचे लीनेस क्लब च्या वतीने सांगण्यात आले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!