दैनिक स्थैर्य | दि. ७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची ७२६२ वी युवा प्रकोष्ठ पदाधिकारी कार्यशाळा शिबिर नुकतेच छत्रपती शाहू महाराज समाज मंदिर, महात्मा फुले नगर, कामगार वसाहत, फलटण येथे संपन्न झाला.
यावेळी राहुल टाक (युवा प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष) यांनी थोर पुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. तसेच त्यांचा सत्कार सातारा जिल्हा युवा प्रकोष्ठ व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस फलटण शहराच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. त्यांनी तरुण पिढीला मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास श्री. राजू मारूडा (अध्यक्ष, पुणे जिल्हा विभागीय) यांचाही विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यातील सर्वांनी पुष्पहार, गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी युवा प्रकोष्ठचे संजय तंबोले, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ललित टाक, प्रदेश निरीक्षक लोकेश तारमळ, सचिव प्रदेश अनिल झुंज, अध्यक्ष अमरावती विभागीय संतोष मकवाना, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर अविनाश जेधे, जिल्हाध्यक्ष वर्धा विकी सारवान, जिल्हाध्यक्ष बुलढाणा मनोज मारुडा, अध्यक्ष फलटण शहर रमेश वाघेला, उपाध्यक्ष फलटण शहर हेमंत सोलंकी, इचलकरंजी सम्राट खैराल, शहराध्यक्ष पुलगाव राजू वाघेला, कागल किसन सोलंकी उल्हासनगर, भारत गोयल, संदीप दाभाडे, वर्धा रूपेश वाल्मिकी, सातारा किशोर भगत, कोरेगाव पवन टाक, लोणंद पुरूषोत्तम मारूडा, गांधीनगर कोल्हापूर, अमन वाघेला, रोहित मारुडा, सागर वाळा, लखन डांगे, सारंग गलियल, मयूर मारुडा, निखिल वाळा, विनोद मारुडा, राहुल डांगे, प्रदीप मारुडा, पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते.
सूत्रसंचालन विशाल मारूडा, युवा प्रकोष्ठ प्रदेश संघटक आनंद डांगे, सातारा जिल्हाध्यक्ष युवा प्रकोष्ठ यांनी आभार मानले.