रामराजेंना लोकसभेवर पाठवण्यासाठी माझे अनुमोदन : ना. अजितदादा पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 09 मे 2023 | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संसदीय कामामुळे त्यांच्याबद्दलचा आदर हा नेहमीच आमच्या सारख्या सर्वांच्यामध्ये वाढला आहे. श्रीमंत रामराजे यांच्या विधान परिषदेच्या सभापती पदाच्या काळामध्ये त्यांनी केलेले जे कार्य आहे ते उल्लेखनीय आहे. विधान परिषदेमध्ये उत्कृष्ट सभापती म्हणून श्रीमंत रामराजे यांचे नाव नेहमीच वरच्या स्थानावर राहणार आहे. श्रीमंत रामराजे यांनी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीमय करण्याचे काम केले आहे. श्रीमंत रामराजे यांच्या कार्याची नोंद इतिहासात कायमच राहणार आहे. तालुक्याच्या व जिल्ह्याच्या विकासाकरिता तसूभर सुद्धा कमतरता आम्ही पडू दिली नाही व आगामी काळामध्ये सुद्धा कमी पडू देणार नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी श्रीमंत रामराजेंना लोकसभेवर पाठवण्यासाठी जी सूचना मांडली त्या सूचनेस माझे अनुमोदन आहे. मी आणि जयंत पाटील म्हणल्यावर शरद पवार साहेबांना आमचे ऐकण्याशिवाय गत्यांतर राहणार नाही; असे मत विरोधी पक्ष नेते ना. अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

फलटण येथील मुधोजी क्लबच्या मैदानावर आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये ना. अजितदादा पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मंत्री व जेष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, माजी मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, सुनील भुसारे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दीपक साळुंखे – पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पदमश्री डॉ. अनिल राजवंशी यांच्यासह फलटण तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.

आता आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्याचे वतीने सातारा येथे सुद्धा श्रीमंत रामराजे यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. श्रीमंत रामराजे यांच्यासोबत मी सुद्धा 1991 साली राजकारणात आलो. मालोजीराजे, शिवाजीराजे हे राजकारण व समाजकारण करणारे नेतृत्व होते. यशवंतराव चव्हाण साहेबांना खंबीरपणे साथ देण्याचे काम मालोजीराजे यांनी त्याकाळी केले होते. बारामतीच्या परिसरामध्ये पवार साहेबांचे नेतृत्व आल्यावर बारामतीचा विकास सुरू झाला. बारामती तालुक्यातील सर्व संस्था ह्या आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वात सुरू होते परंतु त्यावेळी विविध नेतृत्व हे फलटणमध्ये होते. दूध संघ हे सुभाष शिंदे, बाजार समिती विजयराव बोरावके, श्रीराम कारखाना हणमंतराव पवार, जिल्हा परिषद व पंचायत समिती ही चिमणराव कदम यांच्या नेतृत्वात सुरू होते. परंतु रामराजे राजकारणात आल्यावर जनतेने रामराजे यांच्याच नेतृत्वात सर्व संस्था ह्या त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे, असेही अजितदादा पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना ना. अजितदादा पवार म्हणाले कि, फलटण मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर दीपक चव्हाण हे रामराजे यांच्या नेतृत्वात उत्तम कामकाज करीत आहेत. शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी आणण्याचे काम पूर्वी मालोजीराजे व आता रामराजे यांनी केले आहे. रामराजे पहिल्यांदा निवडून आल्यावर अतिशय प्रतिकूल काळ होता; त्यावेळी खोके किंवा इतर विषय नव्हते. अपक्ष आमदार असून सुद्धा तालुक्याला व जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे काम असणारे कृष्णा खोरे महामंडळ स्थापन रामराजे यांनी केले. धोम बालकवडी, नीरा देवधर, उरमोडी असो राज्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम रामराजे यांनी केले आहे. कृत्रिम पाऊस पाडता येईल का ? असा प्रयत्न सुद्धा आम्ही विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात केला होता. आपल्या समोर असणाऱ्या अडचणींवर मात करून काम कस करावं हे रामराजे यांनी दुष्काळाच्या वेळी कळलं होत. आज पाठीमागे वळून पाहताना काय घडलं आहे ? कस घडलं आहे ? हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. सर्व जिल्ह्याला एकसंघ करण्याचा प्रयन्त रामराजे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेला निकाल लागताना जर फलटण तालुक्याचा विचार केला तर विरोधकांना भोपळा सुद्धा फुटला नाही. रामराजे यांच्या माध्यमातून जिल्हा बँक यशस्वीरीत्या सुरू आहे. रामराजे विधान परिषदेचे सभापती असताना यांचे जावई हे विधान सभेचे अध्यक्ष झाले; असे उदाहरण महाराष्ट्रात नाही.

पाण्याच्या प्रश्नावर बोलणे आता झाले आहे. धोम – बालकवडी, नीरा देवधर, उरमोडीची आठवण झाल्याशिवाय मला राहणार नाही. आमदार झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, खासदार शरद पवार, ना. अजितदादा पवार, जयंत पाटील कोणाची नावे घ्यावी व किती नावे घ्यावी ? कारण कि सर्वांनी खूप मदत केली आहे. युतीच्या काळात दोन आमदार पाठिंबा दिला की राज्यमंत्री देत होते परंतु आम्ही मंत्रिपद घेतले नाही. त्यावेळी जलसंपदा विभागाचे बजेट खूप कमी होते. नेमकी गरज काय आहे ? हे ओळखून दिलेल्या संधीचा उपयोग करण्याचा वारसा आमच्या घराचा आहे. त्यावेळी नीरा खोऱ्यात आपल्या सर्वांना मारदर्शन करण्याचे काम मालोजीराजे हे करीत होते; असे मत शरद पवार साहेब करीत होते. चिमणराव कदम यांचा पराभव करण्याचे कोणीही करू शकत नव्हती असे चित्र होते. परंतु फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची साथ मिळाली नसती तर आज आम्ही इथे दिसलोच नसतो. जिथे मी काम केले तिथे मला सर्वांची साथ मिळाली, असे मत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्याचे खरे भगीरथ हे रामराजेच : जयंत पाटील

आपल्या तालुक्याची व जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याचे काम श्रीमंत रामराजे यांनी केले. आपल्या कोणालाही रामराजे यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. तुमच्यामध्ये रामराजे हे समरस झालेले आहेत. फलटण, खंडाळा, माण व खटाव या तालुक्यांच्या ह्या दुष्काळी तालुक्याची सेवा ही रामराजे यांनी केली आहे; याचा मी स्वतः साक्षीदार आहे. रामराजे नगराध्यक्ष, आमदार झाले. 1995 साली 45 आमदार हे अपक्ष म्हणून राज्याच्या विधानसभेवर निवडून आले होते; त्या सर्वांना एकसंघ करण्याचे काम रामराजे यांनी केले. आपण एकट्याने बळ लावून चालणार नाही; तर सर्वांनीच ताकद लावली पाहिजे; असा विचार रामराजे यांनी केला व तो यशस्वी रित्या राबिविली त्यांचे उदाहरण म्हणजेच कृष्णा खोरे महामंडळ आहे. राज्याच्या उर्वरित भागात त्यावेळी कोणतेही महामंडळ नव्हते. 1999 साली सरकार आल्यावर कृष्णा खोरे बळकट करण्याचे काम रामराजे यांनी केले. रामराजे यांनी कुठून कुठून धरणं, बोगदा व कालवा काढले हे रामराजे यानंच माहीत आहे. जिहे कठापुर हे फक्त रामराजे यांनीच केले आहे. सातारा जिल्ह्याचे खरे भगीरथ हे रामराजेच आहे. सोळशी येथे सुद्धा एक धरण रामराजे यांनी प्रस्तावित केले आहे; ते मी मंत्री असतानाच प्रस्तावित होते. त्यांना सभापती पदी पदावरून बदलू नयेत अशी इच्छा सर्वच पक्षाची होती. रामराजे यांनी कधीही राजेशाही थाट कोणालाही कधीच दाखवला नाही. आता आगामी काळामध्ये रामराजेंनी आपले नेतृत्व आता दिल्ली मध्ये जाऊन केले पाहिजे; अशी आमची इच्छा आहे. राजेंना आता दिल्लीला पाठवले पाहिजे. रामराजे यांच्यासारख्या चांगल्या नेतृत्वाला देश पातळीवर जाण्याचे काम करण्याची गरज आहे. रामराजे यांच्या सोबत संजीवराजे यांना सुद्धा आता पक्ष ताकद देईल, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

श्रीमंत रामराजे म्हणजे सर्व प्रशांची जाण असलेले नेतृत्व : आमदार बाळासाहेब पाटील

श्रीमंत रामराजे हे उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. रामराजे यांनी फलटणच्या नगरपालिकेपासून राजकारणामध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर आमदार, कृष्णा खोऱ्याची स्थापना, महसूल मंत्री, जलसंपदा मंत्री अश्या विविध पदावर रामराजे यांनी यशस्वी कामगिरी केली. रामराजे हे पक्ष स्थापनेपासून पवार साहेब व राष्ट्रवादी सोबत आहेत. 75 वय म्हणजे जास्त वय आहे असे काही आम्हाला वाटत नाही. श्रीमंत रामराजे म्हणजे फलटण तालुक्यातील नव्हे तर संबंध सातारा जिल्ह्यातील सर्व प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व आहे, असे मत माजी मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे सेनापती म्हणून रामराजे यांनी काम करावे : आमदार शशिकांत शिंदे

दुष्काळी भागामध्ये ज्याने पाणी पोहचवले अश्या ह्या नेत्याचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस आपण साजरा करीत आहोत. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्या कामाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करून देणारा नेता म्हणजे श्रीमंत रामराजे होय. फलटण, खंडाळा व लोणंद हा परिसर पाणी व औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याचे काम फक्त आणि फक्त श्रीमंत रामराजे यांनी केले आहे. पदाला प्रतिष्ठा निर्माण करण्याचे काम रामराजे यांनी केले आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या सभापती पदावर अनेक व्यक्ती झाल्या होत्या; परंतु श्रीमंत रामराजे यांनी सरकार नसताना सुद्धा रामराजे यांनी आपले पद कायम ठेवण्याचे काम त्यांनी केले होते. टीका करणारे टीका करत असतात; अपघाताने आल्यावर श्रेय घेण्याचे काम काही करत आहेत. आता वेळ संघर्षाची आहे. आमची सर्वांची इच्छा अशी आहे की; सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे सेनापती म्हणून श्रीमंत रामराजे यांनी आता आगामी काळामध्ये काम करावे कारण कि राजकारणात बाजी पालटवण्याची ताकद ही फक्त आणि फक्त श्रीमंत रामराजे यांच्याकडेच आहे, असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

खंडाळा व फलटण तालुक्यामध्ये असलेले पाणी हे फक्त श्रीमंत रामराजेंच्यामुळेच : आमदार मकरंद पाटील

श्रीमंत रामराजेंचे राजकारणामध्ये अद्यापही काही स्वप्न असेल तर ती परमेश्वराने पूर्ण करावी; अशी मी प्रार्थना करतो. नाईक निंबाळकर घराण्याला एक उज्वल अशी परंपरा आहे; मालोजीराजे साहेब असतील किंवा शिवाजीराजे असतील तर त्यांचाच समर्थ वारसा असा रामराजे पुढे सक्षमपणे नेहत आहेत. मालोजीराजेंनी त्यांच्या काळामध्ये वीर धरण बांधले व त्याकाळी फलटण तालुक्याला कसे पाणी मिळेल यासाठी मालोजीराजे कायमच प्रयन्तशील होते व यशस्वी सुद्धा झाले. त्यांचाच वारसा शिवाजीराजे यांनी चालवला; श्रीराम कारखान्याच्या माध्यमातून शिवाजीराजे यांनी फलटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याचे घर सक्षम करण्याचे काम शिवाजीराजे यांनी केले. आणि त्यानंतर रामराजे यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील दुष्काळी तालुका ही ओळख पुसण्याचे काम रामराजे यांनी केले. धोम – बलकवडी धरणाच्या सुरवातीला वाई तालुक्यातील जनता ही रामराजे यांना वेड लागले असेच म्हणत होते कारण डोंगराला बोगदा पाडून पाणी जेल असे वाटत नव्हते परंतु त्यामुळे खंडाळा व फलटण तालुक्यामध्ये पाणी आणण्याचे काम हे रामराजे यांच्याच मुळे झाले आहे. आगामी काळामध्ये सातारा येथे जिल्हावासीयांच्या वतीने मोठा कार्यक्रम करू; असे आश्वासन यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी दिले.

आज फलटण कारांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आज श्रीमंत रामराजे साहेब यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मान होत आहे. ही मोठी गोष्ट आहे. श्रीमंत रामराजे यांचे जे कार्य आहे ते हिमालयाएवढे मोठे आहे. श्रीमंत रामराजे यांच्यासारखा नेता फलटणला व सातारा जिल्ह्याला लाभला हे आपले सर्वांचे भाग्य आहे. श्रीमंत रामराजे जी आधुनिक भगीरथ ही पदवी जनतेने दिली आहे; स्वतःहून लावलेली पदवी नाही. दुष्काळी फलटण तालुक्यात कृष्णेचे पाणी आणण्याचे काम श्रीमंत रामराजेंनी केले आहे. श्रीमंत रामराजे यांचे महाराष्ट्र राज्यावर अनेक उपकार आहेत; असा गौरव माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांनी केला होता. खासदार शरद पवार, ना. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पश्चिम महाराष्ट्राचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे, असे मत आमदार दीपक चव्हाण यांनी प्रास्ताविकात केले.

जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले.


Back to top button
Don`t copy text!