सार्वजनिक बांधकाम विभागाचा मानाचा पुरस्कार; फलटणचे उपअभियंता अजय देशपांडे यांचा राज्य शासनाकडून गौरव

सार्वजनिक बांधकाम विभाग, फलटणचे उपअभियंता अजय देशपांडे यांना महाराष्ट्र शासनाचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन २०२५-२६ चा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ११ सप्टेंबर : सार्वजनिक बांधकाम विभाग फलटण उपविभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षासाठीचा उल्लेखनीय कामगिरीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध केला असून, त्यांच्या या यशाबद्दल फलटण तालुक्यातून मोठे कौतुक होत आहे.

महाबळेश्वरमधील उल्लेखनीय कार्याची दखल

अजय देशपांडे यांनी यापूर्वी महाबळेश्वर येथे प्रभावी कामकाज केले आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या बहुचर्चित असलेल्या महाबळेश्वर येथील ‘केबल स्टे ब्रिज’च्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या या प्रशासकीय आणि तांत्रिक कौशल्याची योग्य दखल घेत राज्य शासनाने त्यांना या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव

शासकीय पातळीवर मिळालेल्या या महत्त्वपूर्ण गौरवाबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेत्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अजय देशपांडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Back to top button
Don`t copy text!