
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, कोळकी, दि. ६ : काल दि. ५ मार्च रोजी भाडळी बु.।। येथून आईसाहेब महाराज पालखी सोहळा किरकसाल ते श्री क्षेत्र लाटेकडे मार्गस्थ झाला. भाडळी बु.।। येथून जात असताना ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार संपन्न होत आहे. यावेळी श्री क्षेत्र लाटे मधील आयोजकांसह मोहनराव डांगे, हनुमंतराव शिरतोडे, सुनिल डांगे, ऋषिकेश भोईटे, पवन डांगे, स्मित डांगे यांच्या सह जाणता राजा प्रतिष्ठान, नेहरु युवा मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

