
थेट WhatsApp वर मिळवा
निरा-लोणंद मार्गावर पाडेगाव हद्दीत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने कारवाई करत २ १० लिटर हातभट्टी दारूसह कार जप्त करून एका संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २० नोव्हेंबर : निरा-लोणंद मार्गावर पाडेगाव गावाच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने सापळा रचून अवैध हातभट्टी दारूच्या वाहतुकीवर कारवाई केली आहे. या कारवाईत २१० लिटर हातभट्टी दारू आणि चारचाकी वाहनासह ५ लाख २२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाडेगाव हद्दीत सापळा रचून धडक कारवाई
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने १९ नोव्हेंबर रोजी पाडेगाव गावाच्या हद्दीत सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी ३५ लिटर क्षमतेचे ६ प्लॅस्टिक कॅन भरलेली एकूण २ १० लिटर हातभट्टी दारू आणि पाच लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी असा एकूण ५ लाख २२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
संशयितावर गुन्हा; नागरिकांचे आवाहन
या प्रकरणी रितीक विशाल चव्हाण (वय २७, रा. जेऊर, ता. पुरंदर, जि. पुणे) या संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई आयुक्त राजेश देशमुख आणि सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बनावट तसेच हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक आढळल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे.





