अहिल्यानगरच्या राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळाचा जयपूर पॅलेसचा भव्य देखावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १२ सप्टेंबर २०२४ | फलटण |
राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळ अहिल्यानगर, फलटण या मंडळाने यावर्षी भव्य असा आकर्षक जयपूर पॅलेसचा (प्रतिकृती) भव्य देखावा उभारला आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप चोरमले असून या मंडळाचे हे १४ वे वर्ष आहे. या मंडळाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ वर्गणी मागत नाही. ज्या कुणाला वर्गणी द्यायची इच्छा आहे त्यांचीच श्रींच्या चरणी देणगी अर्पण केली जाते.

या देखाव्यात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. श्रींची आकर्षक मूर्ती त्यामध्ये विराजमान केली असून आकर्षक चांदीच्या दागिन्यांनी श्रींच्या मूर्तीला सजविले आहे. मुख्य गाभार्‍यात श्रींची प्रतिमा खूप सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर फुलांची आकर्षक सजावट केली आहे. छोटे कारंजे बसविले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिक, महिला सेल्फी फोटो काढत आहेत.

हा देखावा पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गणेश भक्त गर्दी करत आहेत. खूप गणेश भक्तांना हा गणपती पावला आहे. त्यामुळे भक्त नवस फेडण्यासाठी या गणपतीला येत आहेत. यापूर्वीही मंडळाने खूप मोठे आकर्षक देखावे सादर केले आहेत. मंडळाचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते या सर्वांचे सहकार्यामुळेच हा भव्य आकर्षक असा देखावा उभा करू शकलो, असे मंडळाचे संस्थापक संदीप चोरमले यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!