Phaltan मध्ये अहिल्यादेवी जयंती दणक्यात साजरी करणार : BJP तुकाराम शिंदे; अदृश्य शक्ती कडून समाजात फुट पडण्याचे काम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 31 मे 2024 | फलटण | राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती फलटण मध्ये दणक्यात साजरी करण्यात येणार आहे. फलटणमध्ये एकच जयंती साजरी व्हावी! यासाठी खासदार रणजितसिंह यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आग्रही होतो; त्याबाबत काही बैठका सुद्धा संपन्न झाल्या परंतु विरोधकांच्या गटांमध्ये असणाऱ्या अदृश्य शक्तीकडून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. व त्यामुळेच दोन जयंती साजऱ्या होण्याची शक्यता असल्याचे मत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी व्यक्त केले.

फलटण येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तुकाराम शिंदे, कार्यकारी अध्यक्ष संदीप चोरमले व ज्येष्ठ समन्वयक महादेवराव पोकळे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की; महापुरुषांच्या जयंती साजरी होत असताना एकत्र जयंती साजरी करावी यासाठी आम्ही खासदार रणजजितसिंह यांच्याकडे प्रस्ताव मांडला त्यावर खासदार रणजितसिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की “जर संपूर्ण समाज एकत्र येऊन जयंती साजरी करत असेल तर आपली काही हरकत नाही. आपल्या माध्यमातून किती वर्गणी व इतर कोणते सहकार्य लागणार आहे; ते सांगावे. आपण सर्वतोपरी करू संपूर्ण समाज एकत्र येत असेल तर समाजापेक्षा मोठे आपण नाही.

राजकीय झालर बाजूला ठेवून जयंती साजरी करण्यासाठी आमची तयारी होती

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करत असताना सर्व प्रकारची राजकीय झालर बाजूला ठेवून एकत्रित काम करण्याची आमची तयारी होती. याबाबत विविध बैठका संपन्न झाल्या होत्या. यामधील महत्त्वाची बैठक म्हणजे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा बैठक संपन्न झाली होती. परंतु त्यानंतर काही वेळाने “आम्ही एकत्र जयंती साजरी करू शकत नाही” असे स्पष्ट मत ज्येष्ठ नेते भीमदेवराव बुरुंगले यांनी दूरध्वनीद्वारे आम्हाला सांगितले. महापुरुषांच्या जयंती मध्ये सुद्धा राजकीय स्वार्थ बघण्याचे काम विरोधी गट करत आहे; असे मत यावेळी महादेवराव पोकळे यांनी व्यक्त केले आहे.

विरोधक समाजात फुट पाडण्याचे काम करतात

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक एकत्रित बैठका संपन्न झाल्या होत्या. त्यानंतर एकत्रित जयंती साजरी करण्याच्या निर्णयापर्यंत सर्वजण पोहोचले होते. परंतु विरोधक हे राजकीय स्वार्थ डोळ्यापुढे ठेवून मुद्दामून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम करीत आहेत; असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले यांनी व्यक्त केले.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांमध्ये साजरी करण्यात आलेल्या जयंती उत्सव कार्याचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!