कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचा राज्यपालांच्या हस्ते ‘कृषी सेवारत्न’ पुरस्कार देऊन गौरव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १ ऑक्टोबर २०२४ | मुंबई |
महाराष्ट्र शासनाचा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार’ सासकल (ता. फलटण) चे कृषी सहाय्यक सचिन जाधव यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंढे व प्रधान सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बनवडे, फलोत्पादन संचालक महाराष्ट्र राज्य कैलास मोते तसेच संचालक विनयकुमार आवटे, विकास पाटील, सुनील बोरकर आणि अंकुश माने सहसंचालक यांच्या उपस्थितीत नॅशनल स्पोर्ट्स क्लब, वरळी मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

सचिन जाधव यांना सातारा जिल्यातील पहिला कृषि सेवारत्न पुरस्कार मिळवण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषि विभागाकडून दिला जाणरा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

या पुरस्काराबद्दल जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषि अधिकारी फलटण सुहास रनसिंग, तालुका कृषि अधिकारी फलटण, दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषि अधिकारी विडणी शहाजी शिंदे, कृषि पर्यवेक्षक अजित सोनवलकर तसेच कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी सहाय्यक संघटना तसेच त्यांचे वेगवेगळ्या स्तरामधून अभिनंदन केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!