
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । फलटण । कृषि विभागा मार्फत कापूस व ऊस पीक प्रात्यक्षिक व शेतकरी कार्यशाळेत महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने सन २०१९-२०२० मध्ये कोरोना कालावधीत उल्लेखनीय व उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या वतीने सन्मानपत्र जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सातारा शिवाजी शेळके यांच्या हस्ते कृषि सहाय्यक सचिन जाधव यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी प्रकल्प संचालक तथा कृषि उपसंचालक सातारा विजय कुमार राऊत, उपविभागीय कृषि अधिकारी फलटण भास्करराव कोळेकर ,डॉ राजेंद्र वाघ शास्त्रज्ञ,महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी , तालुका कृषि अधिकारी फलटण सागर डांगे इतर मान्यवरांच्या उपस्थित होते.
