
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२२ । फलटण | एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयामार्फत कृषी कार्यानुभव अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
याअंतर्गत हिंगणगाव येथे केळी या पिकामधील “पिल्ले काढणी”या विषयाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर सादर केले व त्याबद्दल माहिती सांगितली. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्रा. एन. एस. ढालपे, प्रा.एन.ए. पंडित, प्रा.एस.वाय. लाळगे आणि विषय मार्गदर्शक प्रा. एस. एस. अडत यांचे कृषीदूत विश्वजीत गिरीगोसावी, मंगेश चव्हाण, मयुरेश भोसले, संकेत दवणे, दीपक मरकड,अभिषेक टेकळे, ऋषिकेश चव्हाण यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.





