करंजखोप येथील कृषीदूतांनी शेतीच्या निगडित वापरल्या जाणार्‍या अ‍ॅप्लीकेशनबाबत घेतले प्रात्यक्षिक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२४ | फलटण |
कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत शेतीशी निगडित असलेले अ‍ॅप्लीकेशन कसे वापरावे, याविषयी प्रात्यक्षिक सादर केले.

या अ‍ॅप्लीकेशनद्वारे खते, कीटकनाशके कशी खरेदी करावीत, त्याचबरोबर हवामानाची माहिती कशी घ्यावी, याची माहिती दिली. शेतकरी आपला शेतमाल या अ‍ॅप्सद्वारे कसे विकू शकतात, याचीदेखील माहिती शेतकर्‍यांना दिली.

कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, कार्यक्रम अधिकारी व विषयतज्ज्ञ प्रा. नीतीषा पंडित मॅडम, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत दुधाळ सौरभ, शिवरूप मिंड, लोखंडे सुप्रीत, बेलदार शुभम, ढोबळे सुमित, दोडमीसे शुभम यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले.

Back to top button
Don`t copy text!