स्थैर्य, पुणे, दि. 21 : शहरातील आत्महत्या सत्र थांबत नसून, कौटुंबिक वादातून पतीने गळफास घेतल्याचे पाहिल्यानंतर पत्नीनेही गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी ही धक्कादायक घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. सूरज पालसिंग सोनी (वय २७, न्यू नानापेठ) व करिना पालसिंग सोनी (वय २०) अशी आत्महत्या केलेल्या दांपत्याची नावे आहेत. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात येत आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.