दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२२ । फलटण । लोणीकंद ते चाकण दरम्यान असलेल्या महापारेषणच्या विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झालेला होता. यामुळे आज, दी. ०९ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे साडेपाच पासून पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे व सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झालेला होता. त्यानंतर सुमारे सहा तासांनी विविध भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत होत आहे. महापारेषण व महावितरण कंपनीच्या अधिकार्यांलनी तातडीने उपाय योजना करून वीजपुरवठा सुरळीत केलाला आहे.
महाराष्ट्रराज्य विद्युत वितरण कंपनीच्या 400 KV अतिउच्च दाब वाहिन्यांवर तांत्रिक बिघाड झालेला होता. MSEDCL मार्फत युद्धपातळीवर काम करण्यात आलेले होते. काम पूर्ण होण्यासाठी नक्की किती कालावधी लागेल हे निश्चितपणे कोणीही सांगू शकत नव्हते. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे व सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग हा अंधारात गेलेला आहे. “वर्क फॉर्म होम” मध्ये कामकाज करणार्याा कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला होता. वीज नसल्याने वेळेमध्ये लॉगिन करून आपली उपस्थिती ही सदरील कर्मचारी नोंदवू शकलेले नाहीत.