
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, पुणे, दि. 19 : पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 6 हजार 374 क्विंटल अन्नधान्याची तर कांदा-बटाटा, फळे व भाजीपाल्याची 39 हजार 612 क्विंटल इतकी आवक झाली आहे.
पुणे विभागात 18 जून 2020 रोजी 96.167 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.90 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. (टिप : सदरची आकडेवारी दुपारी 1.30 वा. पर्यंतची आहे)
