स्थैर्य, मुंबई, दि.८: अमेरिकेच्या डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने सोन्याचे आकर्षण कमी झाले. मात्र नव्या कोव्हिड-१९ स्ट्रेनच्या वाढत्या प्रभावामुळे सोन्याला काहीसा आधार मिळाला. सौदी अरेबियाने अतिरिक्त उत्पादन कपात करण्याची घोषणा केल्यानंतर क्रूड उच्चांकी स्थितीत स्थिरावला. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये वाढलेलल्या औद्योगिक कामकाजामुळेही बेस धातूंनी नफ्यात विस्तार केला. तथापि, साथीच्या नव्या लाटेमुळे नजीकच्या भविष्यात काहीसे नकारात्मक संकेत आहेत. दरम्यान अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीमुळे पिवळ्या धातूंच्या किंमतींना काहीसा आधार मिळण्याची शक्यता असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: मजबूत अमेरिकी डॉलरमुळे पिवळ्या धातूचे आकर्षण कमी झाले. परिणामे स्पॉट गोल्ड १.५ टक्क्यांनी खाली उतरला व ९१८ डॉलर प्रति औसांवर बंद झाला. जॉर्जिया सिनेट निवडणुक स्थितीत सुलभता आल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्यावर परिणाम झाला. अमेरिकेचे १० वर्षांतील ट्रेझरीचे उत्पादन ९ महिन्यानंतर १ टक्क्यांनी वाढले. डेमोक्रेट्सनी जॉर्जियन सिनेट निवडणुकीत बाजी मारण्यावर बाजारपेठेत बेटिंग असल्याने आर्थिक स्थिती सुधारेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, नव्या विषाणू स्ट्रेनमुळे तणाव वाढला असून आर्थिक स्थिती चिंताजनक झाली आहे. तसेच बाजार प्रगतीची शक्यताही कमी झाली. ब्रिटनमध्ये तर पूर्ण लॉकडाऊन झाला असून हा प्रसार थांबण्याकरिता जपान, दक्षिण अफ्रिकेतही लॉकडाऊनची शक्यता आहे. अतिरिक्त मदतीमुळे पिवळ्या धातूंच्या किंमतींना काहीसा आधार मिळण्याची शक्यता आहे.
कच्चे तेल: सौदी अरेबियाने अतिरिक्त उत्पादन कपात करण्याचे आश्वासन दिल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १.४ टक्क्यांनी वाढले व त्यांनी ५०.६ डॉलर प्रति बॅरलवर विश्रांती घेतली. या देशाने फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये दररोज १ दशलक्ष बॅरलने उत्पादन कपातीची घोषणा केली. नव्या साथीमुळे उद्भवलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर उत्पादन स्थिर ठेवण्यासाठी ही घोषणा करण्यात आली. या घटनेमुळे तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन अहवालानुसार अमेरिकेच्या क्रूडसाठ्यात मागील आठवड्यात ८ दशलक्ष बॅरलची घट झाली. त्यामुळेही तेलाच्या बाजाराला आधार मिळाला. याउलट, जगभरातील रुग्णांची वाढती संख्या व अनेक देशांमध्ये कठोर निर्बंध लागल्यामुळे क्रूडची मागणी कमी झाली व या सर्व गोष्टींना एकूण नफ्यावर परिणाम झाला. घटता तेल साठा व वाढीव मागणीच्या आशेमुळे तसेच अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीमुळे कच्च्या तेलाच्या दरांना फायदा होऊ शकतो.
बेस मेटल्स: बहुतांश एलएमई बेस मेटल्स हिरव्या रंगात स्थिरावले. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमधील सकारात्मक औद्योगिक आकडेवारीमुळे बेस मेटलच्या दरांना आणखी आधार मिळाला. डिसेंबर २०२० मध्ये जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमधील कारखान्यांतील कामकाजात गती मिळालल्याने बेस मेटलसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अमेरिका, चीन आणि युरोपमधील औद्योगिक कामांना बळकटी मिळाल्याने या ट्रेंडमध्ये अधिक भर पडली.
स्टीलच्या दरात वाढ झाल्याने निकेलचे दरही वधारले. तर चीनच्या कोक फ्युचरनेही घटलेल्या पुरवठ्यामुळे जास्त रिटर्न्स दर्शवले. घटता साठा व चीनमधील निरंतर औद्योगिक वृद्धी यामुळे एलएमई कॉपरचे दर ०.४४ टक्क्यांनी वाढले व ते ८,०३७.५ डॉलर प्रति टनांवर स्थिरावले. अमेरिकेच्या अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीमुळे तांब्याच्या दरात आणखी वृद्धी होण्याची शक्यता आहे.