गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, औंध, दि.८: विटा ते पुसेसावळी रस्त्यावर गुटख्याची चोरटी  वाहतूक करणाऱ्या  शिवनाकवाडी ता. बत्तीश शिराळा  येथील दोन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांचेकडून  75गुटख्याची पोती ,इर्टिगा कार असा सुमारे बारा लाख चौतीस हजार रुपयांचा ऐवज औंध पोलीसांनी जप्त केला असून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, पुसेसावळी ते चोराडे रस्त्यावर गस्त घालत असताना  औंधचे सपोनि उत्तम भापकर, पोलीस नाईक संतोष कोळी , प्रशांत पाटील, वळकुंद्रे ,पोळ ,शिंदे होमगार्ड नलवडे,महामुनी ,हुलगे  यांच्या पथकाला  चारचाकी  इर्टिगा गाडी एम  एच 08 झेड 2471मध्ये मागील बाजूस 75पोती व चार बाँक्स  गुटखा  बेकायदेशीर पणे ठेवल्याचे आढळून आले. हा सर्व मुद्देमाल व संशयित स्वप्नील सुरेश शेंडके वय 21व आकाश विजय पवार वय रा.शिवनाकवाडी ता.बत्तीस शिराळा यांना औंध पोलीसांनी ताब्यात घेतले आहे ,सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली असून  पोलीस अधिक्षक बन्सल ,उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  सपोनि उत्तम भापकर व पोलीस कर्मचारी  अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!