माजी अपर पोलीस अधीक्षक रावसाहेब घार्गे यांचे निधन


स्थैर्य, कराड, दि.८: गोवा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मानास पात्र ठरलेले सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक रावसाहेब अनंत घार्गे यांचे निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज गुरूवारी सकाळी कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.
खटाव तालुक्यातील जयराम स्वामींचे वडगाव हे मुळगाव असलेले रावसाहेब घार्गे हे सर्वत्र “काका” म्हणून परिचित होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. कुटुंबवत्सल, शिस्तप्रिय पोलीस अधिकारी असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले काका यांचा जन्म २५ जुलै १९३४ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी पोलीसदलात अधिकारी पदावर १९५९ ते १९९२ अशी ३३वर्ष सेवा कर्तव्य बजावले व अप्पर पोलीस अधीक्षक या प्रतिष्ठेच्या पदावरून सन्मानाने सेवानिवृत्त झाले.
 सेवानिवृनीनंतर ते २७ बर्ष हुतात्मा मंडळाचे अध्यक्ष होते.१९६६ साली त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सहकार्यांसमवेत हुतात्मा मंडळाची स्थापना करुन जयराम स्वामींचे वडगावाचा शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक वाढवण्याचे कार्य साधले.
 जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे ते प्रमुख मार्गदर्शक राहिले.त्यांनी या विद्यालयाला देणग्या मिळवून दिल्या , वैयक्तिक तसेच मुलासुनांच्या सहाय्याने भरीव आर्थिक योगदान देत भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या‌.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनीक असून  सामाजिक क्षेत्रामध्ये अजूनही सक्रीय असलेल्या काकांचा, त्यांच्या  अतुलनीय कामगिरीसाठी, त्यांना २०१५ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विशेष सन्मान पत्र देवून गौरवण्यात आले होते.

Back to top button
Don`t copy text!