आदर्की बु. येथे आज सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा


दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२४ | फलटण |
श्री भैरवनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि., फलटण यांच्यातर्फे आज, रविवार, दि. २१ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४.४४ वाजता बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.

हा विवाह सोहळा अ‍ॅम्बिशन इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेज आदर्की बु.॥, ता. फलटण येथे संपन्न होणार आहे.

या विवाह सोहळ्यातील वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री भैरवनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि., फलटणचे चेअरमन श्री. बाळासाहेब कासार यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!