
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २८ एप्रिल २०२४ | फलटण |
माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय निश्चित करण्यासाठी भैरोबा गल्ली, शुक्रवार पेठ, फलटण येथील सनी चंद्रकांत पवार आणि मित्र परिवार यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये स्वागत करून विकासकामांचे आश्वासन देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे खासदार रणजितसिंह यांचे हात बळकट झाले आहेत.
