प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने उघडणार्‍या 8 जणांवर कारवाई


स्थैर्य, लोणंद, दि. 18 : लोणंद नगरपंचायत हद्दीतील काही भाग सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असून त्यातील अत्यावश्यक दुकाने वगळून उर्वरित दुकाने उघडण्यास मनाई असताना दुकाने उघडी ठेवणार्‍या आठ दुकानांवर नगरपंचायतीने कारवाई करून लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले.

लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी लोणंद नगरपंचायत हद्दीतील काही भाग सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असून त्यातील अत्यावश्यक दुकाने वगळून उर्वरित दुकाने उघडण्यास प्रतिबंध करावयाचा आहे, असे आदेश  पोपट कोंडिबा क्षीरसागर, रोहीत विलास निंबाळकर, गोरख हणमंत माने, रामदास बाजीराव तुपे, पापा पिरमहंमद पानसरे, ऋदा नागेश गर्जे, हणमंत बाजीराव माने, विजय रामचंद्र माने आदी कर्मचार्‍यांना दिले.

कर्मचारी नीरा -सातारा रोडवर असताना रोहीत दोशी यांचे स्वराज ट्रेडर्स, संजय जर्नाधन पाटणकर यांचे कापड दुकान, रामचंद्र शंकर पवार यांचे हारे पाट्या केरसुनीचे दुकान, मारूती तुकाराम पवार यांचे हारे पाट्या केरसुनीचे दुकान, विपीन गुलाबचंद रावल यांचे कापड दुकान, महंमद अलीमहंमद कच्छी यांचे लाकुड वखार, नंदकुमार रामचंद्र गुंडगे यांचे कापड दुकान, दिगंबर मलगुंडे यांचे कापड दुकान अशी दुकाने उघडी दिसली. त्यांच्या विरोधात विजय बनकर यांनी लोणंद पोलिसात तक्रार दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!