बैलगाड्या शर्यतीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 


 

स्थैर्य, सातारा, दि.१५: साप, ता. कोरेगाव येथे काहीजणांनी बैलगाड्या शर्यत भरवली. त्याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून शर्यत भरवणार्‍या दोघांवर व शर्यतीकरिता आलेल्या 14 जणांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी शर्यतीचे छकडे, 7 बैल, 3 दुचाकी, एक जीप असा 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

याबाबत माहिती अशी, दि. 14 रोजी साप, ता. कोरेगाव येथे खडवीचा माळ येथे काही लोकांनी बेकायदेशीर बैलगाडयांच्या शर्यती भरवल्या. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणीादा टाकला. त्याठिकाणी दोन लोकांनी शर्यतीचे आयोजन केले असल्याचे व 14 लोक शर्यतीकरीता हजर असल्याचे मिळून आले. एकजणाने शर्यतीकरीता पेटीएम द्वारे पैसे घेतले होते व तेथे दोन शर्यतीचे छकडे, 7 बैल, तीन मोटार सायकल एक पिकअप जीप असा एकुण 2 लाख 1 हजार रुपयांचा माल मिळुन आला. शर्यतीकरीता बैलांचा वापर करुन त्यांचा छळ केल्याने स्थानिक गुन्हे शाखा सातारा व रहिमतपूर पोलीस ठाणे यांनी मिळून शर्यत भरवणार्‍या व खेळणार्‍या लोकांच्या विरुद्ध संयुक्त कारवाई करुन गुन्हा नोंद केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो. ना. प्रविण फडतरे, निलेश काटकर, शरद बेबले, पो. कॉ. विशाल पवार, धीरज महाडीक, संकेत निकम, वैभव सावंत, चालक संजय जाधव, निवृत्ती घाडगे व रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सपोनि बल्लाळ, हवालदार शिंदे, पो. ना. भुजबळ, पोना कदम, मांडवे, निकम, शेडगे, देशमुख, पाटील, महेश देशमुख यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!