
स्थैर्य, सातारा, दि.०३: कोरोना महामारीत मास्क वापरणे बंधनकारक केले असतानाही सातारा तालुक्यातील जकातवाडी परिसरात विनामास्क फिरणार्या तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भानुदास जाधव, सागर सुतार, विक्रम जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोरोना महामारीत मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी विनामास्क फिरणारे लोक दिसत आहेत. त्या अनुषंगाने कारवाया सुरु झाल्या आहेत. जकातवाडी परिसरात गुरुवार, दि. 1 एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत भानुदास माधव जाधव (वय 48, रा. परळी, ता. सातारा), सागर जोतीराम कुंभार (वय 19, रा. खोडद, पो. निसराळे, ता. सातारा), विक्रम राजेंद्र जाधव (वय 23, रा. 95, मोरे कॉलनी, मंगळवार पेठ, सातारा) हे तिघेजण विनामास्क फिरत असल्याचे सातारा तालुका पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस नाईक धीरज कुंभार यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोईटे करत आहेत.