
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२४ | फलटण |
आसू तालुका फलटण गावचे हद्दीत ४ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता शशिकांत शंकर भिंगारे (वय ५८, राहणार आसू, तालुका फलटण) हा त्याच्या घराच्या आडोशाला बेकायदा देशी दारू विकताना पोलिसांना सापडला. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून ६३० रुपये किमतीच्या देशी दारूच्या सीलबंद ९ बाटल्या जप्त केल्या आहेत.
अवैध दारू विक्री प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो. हवा. साबळे करत आहेत.
