स्थैर्य, फलटण : कोरोना व्हायरसची बाधा टाळण्यासाठी सध्या सगळीकडे मास्क अनिवार्य केला आहे. मास्क न वापरणाऱ्या लोकांना अनेक ठिकाणी दंड भरावा लागत आहे. मास्कमुळे कोरोनाचा प्रसार होत नसल्याची गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे जर्मनीने नुकतंच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीदरम्यान आणि सार्वजनिक वाहतुकीदरम्यान मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. भारतातही कोरोना व्हायरस संसर्गाचे हॉटस्पॉट बनलेल्या मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घाला, अशी आग्रही सूचना केली आहे. याचाच एक भाग म्हणून साखरवाडी ता. फलटण येथे मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करत एकूण रुपये चार हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ. अमित गावडे यांनी दिली.
सादर कारवाई दरम्यान फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन सावंत, साखरवाडी पोलीस आऊट पोस्ट येथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागटिळक, साखरवाडीचे सरपंच विक्रमसिंह भोसले, ग्रामविकास अधिकारी येळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.