जबरी चोरीतील आरोपींचा पोलिसावर हल्ला, सहाजणांना अटक : स्थानिक गुन्हे शाखा, उंब्रज पोलिसांची कारवाई 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २८: स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने निर्जन स्थळी बोलावून जबरी चोरी करणार्‍या टोळीस सातारा स्थानिक गुन्हा शाखा व उंब्रज पोलिसांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केले आहे. याच टोळीला हटकणार्‍या पोलिसाला आरोपींनी दांडक्याने मारून गंभीर जखमी केले होते. 1) राजा रेणू आदिवासी वय 24 रा कटनी, अंजर गजातलाल आदिवासी वय 23, आसद सोनी आदिवासी वय, मुबारक बंदीलाल राजपूत वय 20, दद्दा रेणू आदिवासी वय 22, करोसण बंदीलाल आदिवासी राजपूत वय 26, बंदीलाल भदोसलाल आदिवासी वय 40, खलीस्ते भुरा आदिवासी वय 40 सर्व रा कटनी मध्यप्रदेश अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत पेरले ता. कराड गांवचे हद्दीत जानाई पेट्रोल पंपाचे पुढे सुमारे 100 मिटर अंतरावर शिरगांव बाजुकडे जाणार्‍या रोडवर पाटण पोलीस स्टेश मणुकीचे पो. कॉ. मुकेश संभाजी मोरे ब.नं. 1412 हे शासकीय कामनिमीत्त साताराकडे त्यांचे खाजगी वाहनाने निघाले असताना त्याां बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , पेरले गांवचे हद्दीत सोन्याची डील होणार आहे, अशी बातमी मिळाले ती बातमी पडताळणी करीत असताना पो . कॉ . मुकेश मोरे यांनी त्यांना संशयीत चार इसम रस्त्याकडेला दिसले. त्यांना हटकले व त्यांनी मी पोलीस आहे, तुम्ही इथं काय करतायं. अशी विचारणा केली असता त्या चौघा इसमांनी पो. कॉ . मोरे यांना ते करीत असले शासकीय कामात व्यत्यय आणु त्यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडकी, गजाने मारहाण करुन जखमी केले तसेच इसमांपैकी एका त्याला पकडलेचा रागा पो . कॉ . मोरे यांचे उजवे हाताचे दंडास चावा घेतला असुन मुकेश संभाजी मोरे, पोलीस कॉन्स्टेबल पाटण पोलीस स्टेशन , यांनी उंब्रज पोलीस स्टेशनला दिले फिर्यादीवरुन मुद मध्यप्रदेशातील भाषा बोलणार्‍या इसमांविरुध्द गुन्हा रजि . नं . 9 3 / 2021 भादंविसं . कलम 353 , 332, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि अजय गोरड हे करत आहेत.

तसेच सदरचे इसमांनीच त्यांच्या इतर साथीदारांसह दिनांक 26.02.2021 रोजी रात्री 8.30 वा चे सुमारांस कराड येथु लोकांना सोने कमी दरात देतो असे सांगु फोनवर कॉल करुन उंब्रज येथे बोलावुन तेथून पुढे पेरले फाटयावर बोलावुन शेतात वु त्यांना कमी किमतीत सो म्हणु कापडाचे फडक्याचे गाठोडयात बांधलेले काहीतरी दाखवु त्यांनी त्यांचे जवळील दाखविलेले रु . 12,000/- त्यांचेकडुन जबरी हीसकावुन घेवु त्यांना लाकडी दांडके, लोखंडी गजा मारहाण करु गंभीर जखमी करण्याचा प्रयत् करु धक्काबुक्की करु चोरु हली आहे म्हणु इंद्रजीत सुनिल कांबळे रा. ओगलेवाडी ता. कराड यांनी दिले फिर्यादी वरु उंब्रज पो. स्टे. ला भादंविसं . कलम 3 9 5 , 3 9 7 प्रमाणे गुणा दाखल झाला असु सदर गुल्याचा तपास पोउनि . श्री . तलबार हे करीत आहेत . सदर गु यांचे गांभिर्य ओळखु मा . पोलीस अधिक्षक सातारा श्री . अजय कुमार बंसल साो , अप्पर पोलीस अधिक्षक सातारा मा. धिरज पाटील साो, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण श्री. थोरात, साने, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड डॉ. श्री. रणजीत पाटील सो यांनी मार्गदर्श करुन सदर दोन्ही गुहयातील सर्व आरोपी फरारी असले त्यांचे शोधार्थ पोनि. स्थागुशा सातारा श्री. धुमाळ साो, सपोनि अजय गोरड, सपोनि रमेश गर्जे, सपोनि साबळे यांचे मार्गदर्शाखाली दोन्ही पोलीस पथके रवाना करणेत आली होती. सदर पथकांनी सदर गुन्हयातील आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींनी गुन्हा केलेची कबुली दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास उंब्रज पोलीस स्टेशचे सहा. पोलीस निरीक्षक श्री . अजय गोरड हे करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!