
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, सातारा, दि. २८: शहर परिसरातील सेव्हन स्टार कॉम्पलेक्स आणि जुन्या नगरपालिका कार्यालय परिसरातून दोन दुचाकींची चोरी झाली असल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सचिन धनाजी भोसले (वय ४२, रा. पोगरवाडी, पो. करंडी, ता. जि. सातारा) यांनी गुरुवार, दि. २५ रोजी त्यांची दुचाकी (एमएच ११ – एएम ६३३0) सातारा बसस्थानक परिसरात असणाऱ्या सेव्हन स्टार कॉम्पलेक्सच्या पार्किंगमध्ये लावली होती. येथून चोरट्याने ती चोरुन नेली. दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती आढळून आली नाही. परिणामी त्यांनी याची तक्रार शुक्रवार, दि. २६ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. अधिक तपास पोलीस नाईक मोहिते करत आहेत.
सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या जुुन्या नगरपालिका कार्यालय परिसरातून ज्ञानेश्वर राजेंद्र सिंगनाथ (वय २३, रा. आंंबेडकरनगर समोर, केसरकर पेठ, सातारा) यांची दुचाकी (एमएच ११ – सीएस ९८९४) बुधवार, दि. २४ रोजी सायंकाळच्या सुमारास चोरीला गेली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला मात्र. त्यांना दुचाकी आढळून आली नाही. शुक्रवार, दि. २६ रोजी याची तक्रार त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक झेंडे करत आहेत.



